१) काही शब्द सरकारी धोरणाप्रमाणे लिहावे लागतात. उदा. खेडवळ हा शब्द ग्रामीण असा लिहावा अशी सरकारची अपेक्षा आहे.  असे शब्द  आपण या सुविधेद्वारे सुचवू शकतो. "अ‍ॅटो करेक्ट"  वापरून ते शब्द आपोआप सुधारता येतीलही पण असे करणे लेखकावर अन्याय केल्यासारखे होईल.

सरकारी समितीने शिफारीस केलेले शब्द असे आहेतः

धेडगुजरी : संमिश्र वा संकरित 
चांभारचौकशी : नसत्या चौकशा 
खेडवळ : ग्रामीण, खेडूत 
बाटगा : धर्मांतरीत
खेळखंडोबा : विचका

२) काही इंग्रजी शब्दांना चांगले मराठी शब्द उपलब्ध असून वापरले जात नाहीत.  असे शब्ददेखील या सुविधेद्वारे (राईट क्लिकवर) उपलब्ध करून देता येतील.

३)  काही चुकीचे शब्द भाषेत इतके रुळले आहेत की ते स्पेल चेक डिक्शनरीत घ्यावेच लागले.  अशा शब्दांना शुद्ध शब्द पर्याय म्हणून न दाखविता समानार्थी म्हणून दाखविण्याचा माझा विचार आहे.
_____

दुसरी एक गोष्ट मी मूळ लेखात दिलेली नाही ती अशी की एका शब्दाला दिलेला प्रतिशब्द परत जमा करण्याची गरज नाही. ती सुविधा या सॉफ्टवेअरमध्येच आहे. उदा. अधिकार शब्दाची नोंद पहा.

अधिकार|२
पद 
शासन 

अधिकार शब्दाला दोन पर्याय सुचविले आहेत. आता आपल्याला पद आणि शासन शब्द परत लिहिण्याची आवश्यकता नाही. "combine basic" पर्याय वापरला तर त्या दोन नोंदी आपोआप जमा होतील. म्हणजेच

पद |२
शासन 
अधिकार

शासन|२
अधिकार
पद 
 
वर दिलेले दोन शब्द आपोआप add  होतील. आणि जर ते शब्द आधीच जमा असतील तर त्यात या शब्दांची भर पडेल.  

उदा. पद हा शब्द आधीच आहे असे समजू....

पद|१
सत्ता

आता आपल्याला आधी पद शब्द merge करावा लागेल.  

पद |२
शासन 
अधिकार

पद|१
सत्ता

या दोन शब्दांना मिळवून "पद" या शब्दाची एकच नोंद व्हावी यासाठी thesaurus tools - show / merge duplicates - merge हा पर्याय निवडावा. त्यामुळे नवीन नोंद आपोआप होईल ती अशी....

पद |३
शासन 
अधिकार
सत्ता

आता thesaurus tools - combine पर्याय वापरला की. ३ नवीन शब्द तयार होतील.

शासन|३ 
अधिकार
सत्ता
पद 

अधिकार|३
सत्ता
पद 
शासन 

सत्ता|३
पद 
शासन 
अधिकार

याचा अर्थ "पद" शब्दाचे समानार्थी शब्द जमा केल्यावर उलट शब्द सॉफ्टवेअरद्वारे आपोआप तयार होतील व आपला खूप वेळ वाचेल.  ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला बरेच कोडिंग करावे लागले. :)