मलाही छान पण अपुरा वाटला. अर्थात त्याचे कारणही तुम्ही सांगितले आहे. एस. डी. बद्दल शिरीष कणेकरांनी 'गाये चला जा' मध्ये म्हटलं आहे. :
".... कोणी शास्त्रोक्त संगीत देत होता,
कोणी पंजाबी संगीत देत होता, कोणी रवींद्र संगीत देत होता--- एस. डी. आपला
तरूण संगीत देत होता. 'सुनो गजर क्या गाये' हे तरूण संगीत त्याने 'बाजी'त
एक्कावन साली दिलं. त्यानंतर एका तपाने तो 'दिलका भँवर करे पुकार' हे तरूण
संगीत सुनावीत होता. त्यालाही एक तप उलटलं तरी एस. डी. चं तरूण संगीत घुमत
होतं.- 'अबके सजन सावनमें'.... 'बाजी' च्या वेळची तरूण पिढी पाव शतकानं
वाढली. एस. डी. म्हातारा झाला. साठी बुद्धी नाठी न होताच अलगद सत्तरीच्या
घरात गेला. पण त्याचं संगीत तारुण्याचा उंबरठा ओलांडून पुढे गेलं नाही.
'साला मैं तो साहब बन गया' ही ह्या म्हातार्याची तरणीबांड देणगी
होती....."