ऍलोपथी व इतर पॅथी यांच्यात अनेक फरक आहेत. आधी त्यावर विचार व्हावा.

१- ऍलोपथीत मध्ये त्या उपचार पद्धतीचे रीतसर शिक्षण घेतल्या शिवाय प्रॅक्टिस करता येत नही. इतर पॅथीत असे नाही.  मोठे नांव असलेले वैद्य - बालाजी तांबे, खडीवाले, रामदेव बाबा -  माझ्या माहीती प्रमाणे यांच्या पैकी कोणीही आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले वैद्य नाहीत. बालाजी तांबे मेकॅनिकल इंजीनियर आहेत, खडीवाले बहुतेक सैन्यात होते, रामदेव बाबा फक्त योगासने शिकलेले आहेत. होमयोपथीची पण तीच कथा. तेव्हां कोणा वर किती विश्वास ठेवावा, हा एक प्रश्न आहे.

२- ऍलोपथी मध्ये ट्रीटमेंट मधील सर्व औषधांचे नांव नीट लिहून देणे डॉक्टर वर बंधनकारक आहे. याचे अनेक फायदे होतात. रुग्णाला उपचारांचा फायदा झाला नाही व त्याने डॉक्टर बदलला, तर नव्या डॉक्टरला  आधीच्या डॉक्टरने काय ट्रीटमेंट दिली हे कळते.  त्याच प्रमाणे अपाय झाला तर डॉक्टरला जबाबदार धरता येते. आयुर्वेदात याच्या अगदी उलट आहे. काय औषध दिले हे कधीच लिहून देत नाहीत, कमालीची गुप्तता बाळगतात. मग या औशधाने काही अपाय झाल्यास वैद्याला जबाबदार धरता येत नाही. माझा एक नातलग ज्याला गुढगे दुखी व्यतीरिक्त इतर कोणतेही दुखणे नव्हते, त्याने गुढगे दुखी करता  पुण्यात मोठे नांव असलेल्या एका  वैद्यांचे उपचार घेतले व सहा महिन्यात त्याचा किडनी फेल्युअर ने मृत्यू झाला.  नेफ्रोलॉजिस्ट ने सांगितले कि बहुतेक त्या आयुर्वेद औषधात  भस्म हा प्रकार होता. यात हेवी मेटल्स् असतात, व याने अनेकदा किडनी फेल्युअर होते. पण वैद्याने काहीही लिहून दिले नव्हते, म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही करू शकलो नही.  

३- जर रोग असाध्य असेल तर फक्त ऍलोपथीतच डॉक्टर प्रामाणिक पणे तसे सांगतात.  इतर कोणत्याही पॅथीत "या व्याधीवर उपचार नाहीत" असे सांगत नाहीत. त्या मुळे ज्या व्याधी ऍलोपथी प्रमाणे असाध्य या वर्गात मोडतात, नेमक्या त्याच व्याधी बर्या करण्याच्या वल्गना इतर पॅथी करतात, व तेथेच भोंदूंचे भावते.

तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल, कि केस गळणे या व्याधीवर उपचार असतीलच असे जरूरी नाही. कोंडा होणे यावर कदचित असतील.

चेतन पंडित