मुंबईमध्ये रिक्शाचे नवे परवाने मिळविण्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य
असेल, अशी घोषणा मंगळवारी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.
परिवहन विभागाकडून लवकरच मुंबई महानगर क्षेत्रासाठी एक लाख नवीन परवाने
वितरित केले जाणार आहेत. मात्र, त्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असेल, अशी
अट परिवहन विभागाकडून घालण्यात आली आहे. संबंधित रिक्शाचालकाला मराठी भाषा
येते की नाही, हे तपासण्यासाठी परवाना देण्यापूर्वी मराठी भाषेची लेखी
परीक्षा घेण्यात येणार आहे. .....
येथे वाचा :
(लोकसत्ता १५ सप्टेंबर २०१५)
रिक्शाचा परवाना हवा असेल तर मराठी आलेच पाहिजे