अत्रे यांना एखादी कथा आवडली नाही तर ते या पेक्षाही जास्त "स्वच्छ" शब्दात तसे सांगत असत.   त्या पुढे "अंजली कडे पाठवा, अंजली ला काहीही चालत" असा ही उपदेश करीत असत. (अंजली म्हणजे ना सी फडके यांचे मासिक) .  पण त्यांना कोणी  "इतरही सौम्य मार्ग आहेत" वगैरे सांगितले नाही. कारण ते प्र के अत्रे होते. मी बिचारा चेतन पंडित मात्र आहे. अंजली ला खरोखर काहीही चालत असे का, माहीत नाही. पण मनोगत ने अंजली होऊ नये अशी सदिच्छा. इतर कोणत्या मराठी वेब् साईट ने "मनोगत कडे पाठवा, मनोगत ला काहीही चालत" असे म्हणण्याची वेळ येवू नये.  बाय-द-वे, या कथेचा दर्जा पाहता मी वापरलेले शब्द सौम्योत्तम असेच होते.