अमेरिकेने गौरवले म्हणून आपल्याला अशा माणसाची ओळख हवी आणि ती नसल्यास आपल्याला त्याची लाज वाटली पाहिजे
हे पटत नाही. तसेच आभिमान वाटला पाहिजे म्हणून अभिमानही वाटत नाही. खरंतर एवढ्या मोठ्या माणसाचे अनुकरण करणेही कठीण आहे निदान सामान्य माणसाला तरी कारण सामान्य माणसे ही निदान आपल्या देशात तरी माझ्या माहिती प्रमाणे ८०% च्या आसपास असावीत , रोजचा व्यवहारही सांभाळण्याइतके ज्यांचे उत्पन्नही नाही त्यांना लाज वाटणं आणि अभिमान वाटणं किती कठीण आहे ह्याचा विचार व्हावा. श्री
कल्याणसुंदरम फार मोठे आहेत यात शंका नाही. किंवा सचिन तेंडुलकरही मोठा आहे हेही खरंच. पण सचिन तेंडुलकर सामान्य माणसाला जितका माहीत आहे तितके कल्याणसुंदरम माहीत नाहीत मग लाज वाटणार कशी आणि अभिमान तरी वाटणार कसा ?. मला स्वतःलाही आपला लेख वाचल्यावर श्री कल्याण सुंदरम नावाचे कोणी गृहस्थ आहेत हे कळले. माझे अघोर अज्ञान आहे हेच खरे. असो. तो प्रश्न नाही.तरीही आपल्या
मुळे श्री कल्याण सुंदरम यांचे कार्य काय आहे त्याची माहिती झाली. हे मात्र खरे.