पुढच्याला खाली दाखवून आपला मोठेपणा दाखवण्याची फॅशन . . . . .
टीका करण्याला "खाली दाखवणे" म्हणणे बरोबर नाही. तरी सुद्धा, मी पुढच्याला खाली दाखविले हा आरोप जरी मान्य केला, तरी मी त्यात आपला मोठेपणा कुठे दाखविला? मी तर स्वतः कोणतीच कथा  लिहीली नव्हती. (लिहायची खूप इच्छा आहे, पण तेवढी माझी प्रतिभा नाही याचे पण भान आहे).

तुमच्या सारख्या पंडित मंडळिना नसेल आवडले तर लेखन काढून टाकु या.
  लेखन काढून टाकणे, पुस्तक बाजारातून माघारी घेणे,  वगैरे तेव्हां करतात जेव्हां लेखनात काही आक्षेपार्ह्य असेल. या लेखनात तसे काहीच नाही. त्या मुळे काढून टाकण्याची गरज नाही. संपादन (एडिटिंग) हे प्रकाशानाच्या आधी करण्याची  क्रिया आहे, प्रकाशनाच्या नंतर नव्हे. 
आता काढून टाकले तरी एक फडतूस दीर्घ लेखन वाचण्यात वाचकांचा वेळ गेला, तो परत येणार नाही.