उन्हाळ्यात पाण्याच्या टाकीतले पाणी अक्षरशः उकळल्यासारखे गरम होते त्यामुळे मध्यरात्री पाणी टाकल्यासच ते किमानपक्षी कोमट तरी व्हायचे त्यामुळे तुमचा हा माठातून थंड पाणीपुरवठ्याचा पर्याय मलातरी खूपच आवडला आहे.
हे माठ मानेपर्यंत जमिनीत गाडून टाकल्यास पाण्याच्या बाष्पीभवनाचा प्रश्न मिटेल आणि वरती मातीचे तसराळे ठेवल्यास बागेत येणाऱ्या पक्ष्यांसाठी पाखरडोणीही होईल. गाडलेले माठ वाढलेल्या मुळांनी जखडून फोडून टाकण्याची शक्यता असली तरी हा उपाय एकदा केल्यावर ४-५ वर्षाची तरी सोय व्हायला हरकत नसावी असे वाटते.
हा पर्याय केवळ पाण्याची काटकसर करायला मदतीचा ठरेल असे नाही तर झाडांनाही गारवा (जो उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक असतो) मिळवून देणारा आहे.. मनापासून धन्यवाद.