नवी झाडे लावायची झाल्यास, काळ्या (अल्ट्रा व्हायोलेट ट्रीटेड) प्लास्टिक पिशवीत लावा. पाहिजे त्या आकाराच्या पिशव्या मिळतात. माझ्या बागेत बहुसंख्य झाडे अशी लावल्याने पाण्याची कमतरता भासत नाही. पपई, शेवगा अशी झाडे लावल्यानंतर रोज फार तर प्रत्येक झाडामागे ३०० मि.लि. पाणी पुरते.