नर्सरीमध्ये ज्या काळ्या पिशव्यांमध्ये रोपे लावलेली असतात त्याच पिशव्या म्हणताहात बहुदा तुम्ही पण रोपे छोटी असेतोच त्या पिशव्यांत ठेवावीत ना? असे कुणी खास सांगितलेले नाही पण प्लास्टीक पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा झाला नाही तर झाडांची मुळे कुजतील असे वाटते.
पपई, शेवगा वगैरे मोठ्या झाडांना पहिली ३-४ वर्षेच काय ते नियमित पाणी घालावे लागते आणि नंतर अगदी नाही टाकले तरी चालत असावे. आमच्याकडे पपई, शेवगा नाही पण लिंबू, कडीपत्ता, राय आवळा अशी जी मोठी झाडे आहेत त्यांना भर उन्हाळ्यातही अगदी ४ दिवस अजिबात पाणी टाकले नाही तरी दृश्य असा काहीही फरक जाणवत नाही.
'प्रत्येक झाडाला ३०० मिलि पाणी पुरते' हे वाचून आश्चर्य वाटले.. इतके मोजमापाने कसे काय सांगता येऊ शकते याबद्दल उत्सुकता आहे. गेल्या उन्हाळ्यात आम्ही घरगुती वापर आणि बाग धरून दिवसाला २५० लिटर पाण्यात भागवले होते इतपतच मला सांगता येऊ शकेल पण प्रत्येक झाडामागचं गणित नाही बा सांगता येणार.