मुळात या कथेचं नाव ' सुरुवात ' . कशाची सुरुवात? सासूच्या कटकटीची की नवर्‍याच्या बावळटपणाची की सासर्‍याच्या बोटचेप्या धोरणाची कसली नेमकी? 

नीताजी, अहो साधी गोष्ट आहे. "स्फिंक्स" यांच्या कथा लेखनाची सुरुवात.

प्रशासकांना एक विनंती.  तुमचे देवनागरी टंकलेखन सॉफ्टवेयर काही बाबतीत इतरांपेक्षा चांगले आहे. जसे,  कॅपिटल  E  वापरून  ऍ  किंवा कॅपिटल  O  वापरून  ऑ  ही चिन्हे लिहीणे.  बहुतेक इतर सॉफ्टवेयर मध्ये ही चिन्हे लिहायची सोय नसते, व अश्या वेळी मी मनोगत उघडून तेथे हवा तो शब्द लिहून मग तो कट व पेस्ट करतो.  मात्र दोन गोष्टी फार गैर सोयीच्या आहेत. कॉपी करण्या करता  कंट्रोल सी,  कट करण्या करता कंट्रोल एक्स, व पेस्ट करण्या करता  कंट्रोल वी, अन-डू करण्या करता  कंट्रोल झेड, वगैरे तुमच्या सॉफ्टवेयर मध्ये नाही. त्यामुळे दर वेळी माऊस वर राईट क्लिक करून  . . . . . वगैरे करावे लागते. हे कंट्रोल माउस पेक्षा जास्त सोयीचे असतात. आणि कुणाला माउस जास्त सोयीचा वाटत असेल. तरी त्या बरोबर हे कंट्रोल पण देण्यास हरकत काय?   दुसरे, एकादा भाग सिलेक्ट केला व टाईप केले तर इतर सर्व एडिटर्स मध्ये सिलेक्टेड भाग आपोआप डीलीट होतो. मनोगत एडीटर मध्ये तसे होत नाही. या दोन गोष्टी सुधाराव्यात.