चेतन पंडितांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती. ठीक आहे जरा विचार करून दिली असती तर कदाचित त्यांना शब्द सापडले असते.
नीताजी - तुम्हाला जर असे म्हणायचे असेल, कि मी असे काही तरी लिहायला हवे होते "कथा चांगली आहे. पण त्यात कीर्तीच्या सासूबाईंच्या जीवन विषयक तत्त्वज्ञानाचे सखोल आरस्पानी दर्शन घडत नाही. त्यांचे विचार वरपांगी, टोकाचे, व प्रतिगामी वाटतात. रघुनाथरावांची व्यक्ती रेखा मात्र नीट जमली नाही. एका ठिकाणी त्यांचा स्वर मिष्किल झाला आहे व नंतर त्यांनी डोळे मिचकावले आहेत. नातवंडे असलेल्या आजोबांना असा थिल्लरपणा शोभत नाही. त्या ऐवजी त्यांचा स्वर कातर झाला असता, व त्यांचे डोळे पाणावले असते तर भारतीय संस्कृतीतील एकत्रित कुटुंब पद्धतीचे महत्त्व ही कथा वाचणार्या परदेशी वाचकांना पटले असते. कीर्तीने "भाजी फोडणीला घातली" असा उल्लेख आहे. पण भाजी कोणती, वांग्याची का भोपळ्याची, का आणखीन कशाची, याचा उल्लेख नसल्याने वाचकाचे कथेचे रसग्रहण अर्धवट राहते व कथा वाचून त्याला जो बौद्धिक तृप्तीचा बौद्धिक ढेकर यावयास हवा, तो तसा येत नाही." . . . . इत्यादी. मी असे काही तरी लिहायला हवे होते का? असे शब्द सापडणे कठीण नसते. पण काय आहे, कि मी मराठीतील ख्यातनाम समीक्षक वगैरे नाही. साधा वाचक आहे.