मनोगतावर वापरलेली संपादन सुविधा अतिशय जुनी आहे. मनोगताच्या जन्माच्याही पूर्वी जेव्हा देवनागरी युनिकोड नुकते नुकते दिसू लागले होते तेव्हा घडवलेली आहे. (इ. स. सुमारे २०००).
एव्हाना न्याहाळकांमध्ये कमालीचे बदल झालेले आहेत नवे नवे न्याहाळक आलेले आहेत. (खरे तर तेही आता पुष्कळ 'जुने' झालेले आहेत! )
तेव्हा कंट्रोल - अमुक तमुक असे कळक्रम हाताळण्याची सुविधा मनोगतावर नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे हे खरेच.
त्यातही 'अनडू' (कंट्रोल-झी) हे अतिशय कठीण काम आहे. रोमन कळफलक वापरून देवनागरी टंकलेखन करताना रोमनच्या जागी देवनागरी बदलून लिहिलेली असते त्यामुळे अन-डू करताना पूर्वी नेमके काय होते ते करणे कठीण आहे.
तरीही तुमच्या सुचवणींचा विचार भविष्यात अवश्य करू.
धन्यवाद.