असतो म्हणून त्याला सेवेसाठी नियुक्त करण्यात येते. अधिकारपदावरील व्यक्तीचे ज्ञान आणि निर्णयशक्ती हे कंपनीचे वैभव समजले जाते. व्यवस्थापन  शास्त्राच्या अभ्यासक्रमातील ऑर्गनायझेशनल इंफ्लूअनेस या प्रकरणातील कंपनीची संस्कृती, शैली आणि रचना (ऑर्गनायझेशनल कल्चर, स्टायल ऍंड स्ट्रक्चर या भागात याचे उत्तर मिळते. मी एखादी गोष्ट का करावी याचे उत्तर कायदा किंवा नियम आहे. कशी करावी हे कंपनीची धोरणे, कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूत्रे सांगतात (पॉलिसीज, मेथडस ऍंड गाईडलाईन्स). आपला निर्णय अचूक असेल तर खाजगी कंपनीतील अधिकारी मत देण्यास टाळाटाळ करीत नाही, किंबहुना आपल्या मतावर ठाम आणि आग्रही असतो. जर टाळाटाळ करीत असेल तर कुठेतरी पाणी मुरत असणार. मग अशी नोकरी बदलणे श्रेयस्कर.