प्रतिसादासाठी धन्यवाद.
हो आता आमच्या शहरातले फॉल कलर्स शेवटच्या (वाळक्या) टप्प्यात आहेत. कदाचित आठ दहा दिवसांत केवळ काड्या शिल्लक आहे असे चित्र दिसू लागेल.
हा एक फोटो ६ नोव्हेंबर २०१३ रोजी काढलेला आहे. त्या दिवशी मोसमातला पहिला दखल घेण्याजोगा हिमवर्षाव झाला होता. खरं तर नोव्हेंबर सुरु होण्यापूर्वीच पानगळ पूर्ण होऊन (रंग बदलणारी) झाडे निष्पर्ण झालेली असतात. पण एखादे झाड इतरांपेक्षा मंद गतीने बदलत असते. तसेच हे एक झाड, इतरांच्या काड्या झालेल्या असतानाही याची पाने अजून पिवळीच (त्यानंतर नारिंगी व गदड लाल होणे अपेक्षित).
दोन ऋतूंच्या खुणा स्पष्टपणे एकत्रित पाहायला मिळणे हा तसा दुर्मिळ योग :-) .
तुम्ही म्हणता तसे फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन.