अपयश ही यशाची पायरी असते, हे म्हणतात  ते काही खोटे नाही. पण अपयशानंतर जर स्वस्थ बसलात आणि कोणतीही योग्य कृती केली नाही तर मात्र आधी आलेले अपयश ही पुढच्या अपयशाची पायरी ठरते. उगाच भ्रमात राहून स्वस्थ बसू नये. किंवा दैववादी उपाय करू नये. त्याने अपयश मिळाले म्हणजे आपण आता यशाच्या पायरी जवळ आलो अशी समजूत होते. यश मिळवणं हा योग्य दिशेत प्रयत्न   करण्याचा अभ्यास असतो. असं वागलं नाही तर मात्र यश आणखी लांब पळते.