- कागदावर मत दिले, त्याप्रमाणे निर्णय घेतला व नंतर दुर्दैवाने तो चुकला तर आपण त्यात अडकू, अशी भीती काही जणांना वाटत असावी. वास्तविक, तो निर्णय बरोबर ठरेल, अशीही शक्यता असते.
- मी तसे काही बोललोच नव्हतो, असे तोंडी सूचनांच्या संदर्भात म्हणता येते व तसे म्हणून सुटका करून घेता येते.
- माहिती अधिकाराचा हक्क नागरिकांना आता मिळाला आहे. त्यात सर्व माहिती लेखी मागता येते व ती देणे संबंधित खात्यांवर बंधनकारक असते. तेथे मात्र लेखी या मुद्द्याला कोणाची हरकत दिसत नाही.
विषय एकंदरीत मजेदार, चिंतनीय आहे.