मुटे साहेब सामान्य गिऱ्हाइकाच्या मनात कसला आलाय रावण ? त्याला तर मागतील तो भाव दिल्याशिवाय पर्याय नसतो. आपले म्हणणे
व्यापाऱ्यांबद्दल असेल तर ते योग्य आहे ( कारण मी व्यापारी नाही म्हणून नाही) . साधारणपणे शेती माला कमी भाव देणारे व्यापारीच असतात.
तसेच ते चांगला माल स्वतः वापरतात आणि बाजारात मात्र नित्कृष्ट दर्जाचा माल चढ्या भावाने विकतात. यात नेहमी शेतकरी आणि सामान्य
माणूस दोघेही फसवले जातात. राग मानू नका पण ही वस्तुस्थिती आहे ." त्यामुळे भूमीतून निपजलेल्या वस्तूंची किंमत मोजायचीच नसते " हे
पटले नाही. जर " व्यापाऱ्याच्या मनातल्या रावणाला " असे शब्द वापरले तर जास्त सयुक्तिक होईल. रावणी मनोवृत्ती सामान्य माणसात नसते असे नाही , पण त्याने ती जर बाहेर काढली तर क्रांती होईल की हो. तो ती बाहेर कधीच काढीत नाही ही फार मोठी समस्या आहे. जरा स्पष्ट
लिहिले आहे , त्याबद्दल क्षमस्व.