खरोखरीच शेतकरी महिलांचे वागणे कौतुकास्पद आहे. वाईट परिस्थिती खरंतर माणसाला कृती करायला सांगत असते, पण
माणूस बऱ्याच वेळा भावनांच्या आहारी जाऊन आणि समाजाची भीती बाळगून योग्य कृती करीत नाही. म्हणून तर त्याला परिस्थितिचे चटके
सोसावे लागतात. कारण परिस्थिती आपणहून बदलायला फार वेळ लागतो. परंतू मला हे पटले नाही की जनतेची मानसिकता रावणाची आहे .
ती तशी त्याची नसून व्यापाऱ्यांची आहे. ते चांगला माल शेतक्ऱ्याला फसवून विकत घेतात आणि दडवून ठेवतात . नित्कृष्ट दर्जाचा माल मात्र चढ्या भावाने बाजारात विकतात. त्यात शेतकरी आणि दुसरा पर्याय नसलेला सामान्य माणूस नेहमीच फसवला जातो. मग तो रावण कसा काय ठरतो ? अर्थात ही माझी मते आहेत . पटायलाच हवीत असा आग्रह नाही. माझा "रावण दहनाच्या शुभेच्छा .... " या कवितेवरील प्रतिसाद पाहावा. तो अशाच अर्थाचा आहे. दुवळे आणि मिंधे सरकार आणि उर्मट व्यापारी असल्यावर दुसरे काय होणार ?