योग्य प्रशिक्षित मनुष्यबळाचे काय? आपल्याकडे गरजेइतके प्रशिक्षित मनुष्यबळ आहे का?
हा अगदी दुखऱ्या नसेवर बोट ठेवणारा प्रश्न आहे.
मला जो काही मर्यादित अनुभव (दुरून पाहिलेला) आहे त्याप्रमाणे 'सुमार गुणवत्तेचे मनुष्यबळ' ही गोष्ट 'एक सोयीची गोष्ट' म्हणून पाहिली जाते.
म्हणजे असे :
१. कामावर ठेवताना सुमार गुणवत्तेचे मनुष्यबळ निवडायचे... म्हणजे खर्च कमी.
२. पुढे वर्षानुवर्षे 'असल्या सुमार लोकांना सुधारता येणार नाही' असे म्हणून त्याला कोठलेही विशेष प्रशिक्षण न देता तसेच सुमार राहू द्यायचे. .. आणखी खर्च कमी.
३. आणि कंपनीला वाईट दिवस आले की, 'सुमार गुणवत्तेचे' असे म्हणून ते सोयीने काढून टाकायचे. .... विशेष प्रयत्नांविना खर्च कमी.
चांगल्या गुणवत्तेचे मनुष्यबळ कामावर ठेवले तर या तिन्ही पायऱ्यांवर जड जाते.