आपलं म्हणणं बरोबर आहे. इतर पारंपारिक (साहित्यातली परंपरा) साहित्याकडे माणूस दुर्लक्ष करतो. कारण माणसाला गूढ आणि  रहस्यमय गोष्टींचं जबरदस्त आकर्षण आहे.  जर त्याला या गोष्टी वाचायला मिळाल्या नाहीत तर वास्तववादी किंवा वास्तववादावरच्या  काल्पनिक  लिखाणाचा त्याला कंटाळा येईल. त्यातही गूढतेची भूक भागवणाऱ्या साहित्याला तो जास्त चाहतो. (उदा. जी. ए. यांचे लिखाण) 
गूढ आणि रहस्यमय जीवनाच त्याला आकर्षण व कुतूहल आहे. म्हणून गुन्हेगारांच्या कथा तो  वाचतो.आणि त्यांना अग्रक्रम देतो असे दिसते. पण 
इतर लिखाण त्यामुळे कमी प्रतीचे  ठरत नाही. हे असं पहिल्यापासून आहे. बाबूराव अर्नाळकरांच्या कथा , कादंबऱ्या पूर्वी वाचल्या जात असत. 
अभिजात साहित्य माणसाची ही भूक पूर्णतया भागवू शकत नसेल असे वाटते.