ही कथा अजून सहज फुलवता आली असती. पण हा लेखनाचा पहिला प्रयत्न आहे असे समजून तुम्हाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा. समाजात स्वतः काहीही न करता दुसर्यावर उगाचच टीका करणारे महाभाग असतात... स्वतःची कुठलीही कामगिरी नसताना हे लोक फक्त काही प्रसिद्ध लोकांची उदहरणे देऊन वागायचा प्रयत्न करतात. दुसर्याचा उत्साह कमी करणे हाच यात हेतू असतो. तेव्हा अश्या लोकांना फाट्यावर मारून लेखन सुरू ठेवावे. इथल्या कथा वाचायची काही कोणाला सक्ती नाही. किंबहुना येता जाता फक्त हिणकस शेरेबाजी करणार्या लोकांनी मनोगतापासून दूर राहिलेले बरे. मनोगताची 'अंजली' अश्याच लोकांमुळे होईल.... लेखनाचे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांमुळे नाही.