मला वाटते की 'समीर'ने दुबईलाच राहून त्या अरबाच्या घरावर जमेल तशी स्वतः पाळत ठेवायला हवी होती. त्याची बायको सुशिक्षित असल्याने तिने सुटकेसाठी काही प्रयत्न केले असता त्याला मदत करता आली असती पण तो भारतातच परत निघून गेल्याने ती एकटीच पडली की तिथे. आपल्या नंतर आपल्या पोरीची काळजी घ्यायला कोणी असावे हीदेखील एक भावना असते आईवडलांच्या मनात तिचे लग्न करून देताना पण 'समीर' सारखे नवरे संरक्षणाबद्दल असूननसून सारखेच.. त्यांची भिस्त ही केवळ पोलिस, वकिलाती वगैरेंवर. त्या पोरीबद्दल पुढे काय झाले असेल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. देव तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यास लवकरात लवकर मदत करो.