एक-दोन चुकांची दुरुस्ती:

याच्या अगदी उलटही काही बायका होत्याच. पावशेकाकूंनी, "ती मस्तानी बाजीरावाला नॉनव्हेज खायला देत होती... हे का बघायला जायचं?" असं विचारलं. त्यावर काशिनाथ नाडकर्ण्यांनी, "छे! छे! बाजीराव असा नव्हेच. काय समजलेत? आमच्या कोकणातला होता तो, " असं उत्तर दिलं. आणि त्याला कोचरेकर मास्तरांनी, "बरोबर आहे, तो फक्त कणसं खाऊन लढायचा" असा दुजोरा दिला! त्यांना 'बाजीराव तो वीरच मोठा, कणसे खाउन लढला पठ्ठा' ही शालेय कविता तेवढी पाठ होती.

कोचरेकर मास्तरांना पूर्वीचा भ्रमणमंडळाचा अनुभव होता...ते रात्री नऊच्या खेळाची तिकिटं काढून आले आणि "सहाचा आहे" असं सोकरजींनाना त्रिलोकेकरांना म्हणाले.

तसंच कोचरेकर मास्तर भ्रमण  मंडळाचे खजिनदार नव्हते, बाबूकाका होते ही चूक मूळ पुस्तक पुनः वाचल्यावर लक्षात आली. त्यामुळे हा बदल केला आहे.

- कुमार