आपले मत बरोबर आहे. पण भिडस्त माणुससुद्धा कित्येक वेळेस कोणतीही कृती टाळण्याचे काम करतो असे माझे अनुभव आहेत.
तो त्याचं काम परस्पर कसे होईल हेच पाहतो. जो बोलतो तो मात्र फसतो आणि लोकांच्या रोषाला कारणीभूत होतो. बाकी इतर सगळेच विचार मला पटतात. आपले लिखाण खरे आहे. मी त्याच्याशी सहमत आहे. पण परस्पर पावणे तेरा करणारे लोकही खूप आहेत. ते भिडस्त की संधिसाधू
असा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यांची कामे विनासायास होतात असेही दिसते. तसेच त्यांचे सारखे कौतुक होतानाही दिसते. मनुष्य स्वभाव विचित्र आहे हेच खरे. माझ्या मते आपल्याला जसे वागावेसे वाटते ते कोणाचेही अनुकरण न करता वागावे हे बरे. आपले मत कदाचित वेगळे असण्याची शक्यता आहे. आपण लिहिलेला विषय रोजच्या जीवनातीलच आहे, पण त्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही.