सोनार, तुमचे लेख मी वाचत  आलेलो आहे. बरेचदा  व्यवस्थित मांडणी असते. हाही लेख  चांगला आहे, आजच्या काळातला आहे.  प्रसंग, गरज, समोरची व्यक्ती, तिची मानसिकता या घटकांचे तारतम्य बाळगून स्वतःच्या हिताकरिता नाही म्हणायला शिकलेच पाहिजे. नाहीतर नुकसान होते.         एकदा एका साहित्याशी संबंधित व्यक्तीशी माझी ओळख झाली. ही व्यक्ती एका कवयित्रीचे पतिदेव. या व्यक्तीने एकदा मला साहित्याशी संबंधित काही पत्रांवर पत्ते लिहायला बोलावले. थोडीशी ओळख होती म्हणून मी गेलो व काम करून दिले. त्यानंतर  पुन्हा एकदा अशाच कामाकरिता त्यांनी मला गृहित धरून ''कामालाच ये'' असे फर्मावले. त्यांचा सूर व हेतू लक्षात येऊन मी ठामपणे नकार  दिला.
    परत त्यांचा फोन आला नाही.