नीताताई, तेव्हा सगळेच जण इतके जगत नसत. दहाबारा मुलांपैकी कित्येक मध्येच जग सोडून जात. उरलेल्यांपैकी काही थोडे दीर्घायू होत आणि तेच नजरेसमोर राहात. गेलेल्यांची आठवण राहात नसे. साथीचे रोग, दूषित पाणी, वाघ-लांडगे-साप-विंचूदंश, सततच्या लढाया/हाणामाऱ्या,  पराकोटीचा कष्टयुक्त जीवनसंघर्ष यामुळे माणसे फार जगत नसत. हिंदुस्तानात बायका लहानपणातच बाळंतरोगाने किंवा बाळंतपणातच मरत. कोणी आठवण ठेवीत नसे. साजुक तूप सगळ्यांना उपलब्ध नव्हते. कष्टकऱ्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत होती. शेती बेभरवशाची होती.दुष्काळ तेव्हाही होतेच. आपण गुप्त काळातली, कुशाण काळाची सुवर्णयुगवर्णने वाचतो, त्यात अन्नधान्यसुबत्ता समतेने होती असे गृहीत धरलेले असते. प्रत्यक्ष आयुर्मान किती होते त्याचा अंदाजच करावा लागेल. शिवाय हा सुवर्णकाळ हिंदुस्तानच्या एकंदर इतिहासकाळाच्या मानाने थोडा होता.