कूट किंवा पूड म्हणजे बारीक चूर्ण.
चिरफळ्या म्हणजे अरुंद पण लांब पातळ तुकडे. हे लाकडाचे असतात.
काचऱ्या म्हणजे वर्तुळाकार तुकडे, ह्या बटाट्याच्या असतात.
काप म्हणजेही वर्तुळाकार तुकडे, हे काकडी-मुळा-भेंडी-बटाटा वगैरे भाज्यांचे असतात.
कपटे म्हणजे (कागदाचे) वेडेवाकडे तुकडे
कातऱ्या म्हणजे कातरलेला कागद, कातरलेली सुपारी, वगैरे.
शेवटी कीस हा शब्द उरतो. हा खोबऱ्याचा, लाकडाचा किंवा किसणी/रंधा वापरून केलेल्या कोणत्याही पदार्थाचा असतो. कीस म्हणजे बारीक सडपातळ व अरुंद किंवा थोडेफार रुंद तुकडे. कीस हा शब्दांचाही असतो.
श्रेडेड कागदाला कागदाचा कीस म्हणणे अधिक योग्य वाटते. या बाबतीत वरदा यांच्याशी सहमत.