वरती मी दोन कविता विचारल्या होत्या, त्या परत विचारीत आहे. शिवय तिसरीही एक आहे. कुणाला येत असल्यास कळवावे . कविता अशा :-
१,
मूल पाठिवर विणीत चटई
पेंगत पेंगत बाई जाई
रेड्यापाठी फुटकी भाणडी
त्यावर फडफड करी कोंबडी
२,
हें नव्हें आजचें कैक युगें बा झालीं
ही रीत तयाची अशीच चालत आली
३.
हा जागा असता भयंकर चढे संताप माझे मनी
दाटे कौतुक आणि ममता झोपेंत त्या पाहुनी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शेवटच्या ओळी -
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आहे न्यायच हा जिवंतपणिची टीकार्ह ज्याची कृती
येतां त्या चिरकाल झोंप सगळे गाती तयाची स्तुती.
या तीनही कविता मला विदर्भात शिकताना शाळेच्या पुस्तकांत होत्या.