आपण टॉलरन्सची जी उदाहरणे दिली आहेत ती तांत्रिक आहेत व बहुदा कायद्यासंदर्भात आहेत, जिथे भावना व व्यक्तिगत मत यांना फारसं
महत्त्व नाही . पण धार्मिक बाबतीत ( साधारणपणे  सहिष्णुता हा शब्दप्रयोग धार्मिक बाबतीतच प्रसिद्ध आहे) असे घडताना दिसत नाही . उलट 
सहिष्णू नसूनही मी फार सहिष्णू असल्याचा दावा लोक करताना दिसतात, कारण त्याला कोणतेही मोजमाप नाही. इथे देखावा आणि आरोप प्रत्यारोप यात कोण  जिंकते त्यावरच बघणाऱ्यांचं मत अवलंबून असते असे दिसते. कधी कधी  सहिष्णू या कल्पनेचा राजकीय फायदा घेतलेलाही दिसतो,  किंवा सवंग प्रसिद्धीचा हेतू वाटतो. या विषयाला अमर्याद विकल्प आहेत असे मला वाटते, त्यामुळे कोणत्याही एका निर्णयाप्रत माझ्यासारखा साधारण माणूस येऊ शकत नाही . अर्थात ही माझी बाजू झाली. पण ती बरोबरच आहे असे म्हणणे म्हणजे परत मी असहिष्णू 
असल्याची कबुली देण्यासारखे आहे. जरा आधिक सामाजिक उदाहरण द्यावीत ही विनंती.