मयुरेश यांच्या "याला जबाबदार कोण" मधील प्रतिसादात "अपेशी" हा शब्द वाचला आणि हा प्रश्न पडला की "अपयशी" न लिहिता "अपेशी" लिहिण्याचे नक्की प्रयोजन काय? की दोहोंच्या छटा वेगळ्या आहेत?
हाच शब्द काही वर्षापूर्वी "मटा" मध्य वाचनात आला होता (तेंव्हाही हे विशेषण "सरकार" ला उद्देशून होते!) शिवाय "पेशा" व "पेशी" हे इतर दोन वेगवेगळे रूढ शब्द "अपेशी" च्या अर्थाबद्दल संभ्रम निर्माण करू शकतात ..(पेशा विरहित किंवा अपेशीय (हा शास्त्रीय शब्द असू शकेल :) ) इत्यादी..)
याच कुळात अयशस्वी वेगळा शब्द आहे. अपयशात कर्ता "अपयशी" तर कर्म "अयशस्वी" ठरते. सरकार कर्ते नसल्याने किंवा आपण कर्माची फळे भोगत असल्याने सरकार अपेशी असा काही प्रकार "अपेशी" चा आहे की काय?
तो अपेशी (?) ( शिवाय माझ्या सारखे लोक याचा "उपाशी"शी हि घोळ घालू शकतील !)