केंद्रीय शाळांमध्ये हिंदी, इंग्रजी, संस्कृत, एक अन्य भारतीय किंवा परदेषी भाषा आधीच असल्याने मराठी बंधनकारक करणे शक्य होईल असे वाटत नाही.
शिवाजीचा इतिहास महाराष्ट्रातच का शिकवला जावा? हेही शक्य नाही. असे झाले तर मद्रासमध्ये चेन्नम्मा राणीचा इतिहास, उत्तरेत फक्त औरंगजेबाचा, राजस्थानात राणा प्रतापचा, तर गुजराथेत जयसिंह सिद्धराजाचा इतिहास शिकवावा अशा मागण्या होतील.
केंद्रीय शाळांच्या अभ्यासक्रमांवर राज्य सरकारांचे नियंत्रण नाही. अशी परवानगी मिळाली तर महाराष्ट्र सरकार केंद्रीय शाळात शिकवले जाणारे इंग्रजी, गणित आणि विज्ञान पात्तळ (डायल्यूट) करेल.