लेखात बरेच शब्द चुकीचे आहेत,तमिळ भाषेत थ नसतो. 
त्यामुळे ह्या महान कलावंताचं नाव मुत्तूस्वामी दिक्षितर् असं आहे. ( मुत्तू = मोती)
मुथ्थु असा शब्दच अस्तित्वात नाहिये. 
त्याच बरोबर थिरुवरुर असं नसून तिरुवरुर् असं आहे. 
तिरु हा तमिळ शब्द असून ह्याचा अर्थ संस्कृतमधील श्री सारखा आहे, जिथे जिथे आपण श्री वापरू शकतो तिथे श्री वापरला जातो, 
उदा. श्रीपती = तिरुपती 
श्रीमती = तिरुमती इत्यादी. 
ठ, थ, ध, भ, घ, फ असे उच्चार द्राविड भाषेत नसतात, तरीही कानडी, तेलुगु आणि मल्याळम भाषा हे उच्चार लिहितात आणि संस्कृत शब्दांसाठी वापरतात, पण तमिळमध्ये हे उच्चार लिहिले जात नाहीत आणि वापरलेही जात नाहीत,तमिळ देशी शब्दांत तर हे उच्चार नाहीतच.