काय आहे, की भाव तेथे देव. ती शिळा म्हणजेच शनिदेव हा भाव एकदा का निर्माण झाला की तिथे देव असणारच. आणि दर्शनासाठी झुंडी लोटणारच. मग घेऊ दे की दर्शन सगळ्यांना. एकाचा भाव जास्त आणि दुसऱ्याचा कमी, असा भेदभाव देव तर करत नसणार, मग माणसांनी का करावा? सर्वांना पोटभर दर्शन घेऊन आधी तृप्त होऊ दे. मग नंतर ती शिळा आहे किंवा काय ते सावकाशीने पाहाता येईल.
तसाही हा विषय जुना झाला आहे, निकाल लागायचा तो लागून गेला आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते आणि या निकालाचा परिणाम इतर देवस्थानांवर कसा होतो हे बघायचे.