आपल्याकडे रत्तल हा पाउंडसमान समजला जाई.
पाउंडचे ग्रॅममध्ये रूपांतर केले तर एक पाउंड हा ४५३.५९२३७ ग्रॅम्स इतका होतो.
आपल्याकडे जेव्हा मापांमध्ये दशमान पद्धत सुरू झाली तेव्हा ग्राम किलोग्रॅमचा हिशोब लोकांना कळत नसे. मग चारशे ग्रॅम हे नवे एकक भाजीविक्रेत्यांनी सुरू केले, जे अजमासे एक रत्तलाइतके होई. शिवाय त्यात लबाडी करता येई. भाव किलोवर सांगायचा आणि कोणी रत्तल अर्धा रत्तल मागितले तर एक रत्तलासाठी (चारशे ग्रॅम अंदाजे) अर्ध्या किलोचा भाव घ्यायचा. म्हणजे रत्तलाच्या मापातही सुमारे पन्नास ग्रॅमची खोट आणि भावातही खोट. गिऱ्हाइकाचा दुहेरी तोटा. एक किलो म्हणजे दोन पाउंड अशीच समजूत लोकांनी करून घेतली होती आणि ती व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडली होती.
आजही भाजीसाठी चारशे ग्रॅम हे एकक कित्येक ठिकाणी वापरले जाते.