माणसे समृद्ध झाली की त्यांना मान मिळतो आणि त्यांच्या भाषेलाही. बाकीचे लोक या लोकांशी यांच्या भाषेत बोलण्याची धडपड करतात. यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व ठिकाणीं यांच्या भाषेतून सूचना, उद्घोषणा करतात. माहितीपत्रके यांच्या भाषेतून छापली जातात. सध्या पैश्याला मान आहे. मराठी माणसांकडे पैसा आला की त्यांना आणि त्यांच्या भाषेला मान आपोआप मिळेल. आणि मराठी लोकांचा जीवनव्यवहार जितका वाढेल, तितकी शब्दसंपत्तीही वाढेल. कारण नवनवीन व्यवहार व्यक्त करण्यासाठी नवनवीन शब्दांची गरज पडेल आणि ते निर्माणही होतील.