शेवगाव तालुक्यात आव्हाणे येथील निद्रिस्त गणपती प्रसिद्ध आहे. झोपलेल्या अवस्थेतील गणपतीची मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे.
जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या जवळ खुलताबाद येथे निद्रिस्त अवस्थेतील भद्रा मारुती आहे.
लोणारला चुंबकीय पाषाणापासून बनविलेली झोपलेल्या मारुतीची मूर्ती आहे.
अजंठा लेण्यात झोपलेल्या गौतम बुद्धाचे रंगचित्र आहे.
कंबोडियातील अंगकोर वट येथे झोपलेल्या बुद्धाची मूर्ती आहे.
शेषशायी विष्णू : हे अनेक आहेत. :
१. कर्नाटकातल्या बदामी गुंफेतील शेषशायी विष्णू
२. हरिश्चंद्रगडाच्या वाटेवरती असलेल्या खिरेश्वर येथील एका देवळाच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर ५' गुणिले २' फूट आकारमानाचा एकसंधी शिलाफलक आहे आणि त्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे.
३. शेषशायी विष्णु मंदिर, महिदपुर रोड (बडनगर-मध्य प्रदेश)
४. श्रीशेषशायी विष्णु बिर्ला मंदिर, नागदा (उत्तर प्रदेश)
५. अनंतशायी विष्णू, झांशी (उत्तर प्रदेश)
६. शेषशायी विष्णू, दशावतार मंदिर, देवगढ (झांशी-उत्तर प्रदेश)
७. अलाहबादच्या किल्ल्याजवळ असलेले हे मंदिर निद्रिस्त हनुमानाची प्रतिमा असलेले प्राचीन मंदिर आहे. यामध्ये हनुमान निद्रिस्त मुद्रेत आहे. मूर्ती २० फूट लांब आहे. जेव्हा पाऊस वाढतो तेव्हा मंदिर जलमग्न होते. तेव्हा मूर्तीला दुसऱ्या ठिकाणी ठेवले जाते.
८. केरळमधील त्रिवेंद्रम येथील पद्मनाभस्वामी मंदिरात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे.