आपण उल्लेख केलेल्या सर्वच ठिकाणी तेल वाहण्याची पद्धत बहुधा नसावी. प्रत्येक ठिकाणची उपासनापद्धती निरनिराळी. आणि ही परवानगी निसरडेच करण्यासाठी अशी नाही, तर निदान जवळून दर्शन तरी मिळावे म्हणून आहे. सगळ्या मंदिरांची द्वारे सर्वांना खुली तर होऊंदे , मग सर्वांनी तेल वाहायचे की नाही या प्रश्नाला भिडता येईल.
आपल्या उपासनापद्धतीबद्दल बरेच काही लिहिण्या/बोलण्या/करण्यासारखे आहे. पण एकदम इतकी उंच उडी मारून उपयोगाचे नाही. बदलासाठी आधी प्रबोधन हवे. समाजाची थोडीफार तयारी व्हायला हवी.