देव असतो का; शनी हा देव आहे का; त्याचे त्या अमूक एक शिळेत काही विशेष वास्तव्य आहे का; त्यचे दर्शन अमूक इतके फूट जवळ जाऊन घेतल्याने काही खास फायदा होतो का; व तत्सम सर्व प्रश्न गैरलागू आहेत. मुद्दा आहे तो फक्त भेदभाव नसण्याचा व अधिकारांचा. महिलांना तेथे जाण्याची बंदी कोणी केली, काय कारणास्तव, व कोणत्या अधिकाराने? बास. या पलिकडे कोणताही मुद्दा नाही. उद्या कोणी एकादे देऊळ बनविले जिथे "च" अक्षरा पसून नांव असलेल्यांना बंदी आहे, तर मी त्या विरोधात उतरणारच, नास्तिक असलो तरी. 

चेतन पंडित