शनी हा देव नाही, मुळात देव अस्तित्वात नाही, त्यामुळे तो दगडात असायचा प्रश्नच नाही, अश्या विचाराच्या नास्तिक मनुष्याने स्त्रियांच्या मंदिर प्रवेशबंदीविरुद्ध आग्रही असावे ही माझ्या मते
विसंगती आहे. पुरुषांना जायची मुभा असावी आणि स्त्रियांना नसावी ही असमानता आहे हे मान्य, परंतु याच असमानतेमुळे स्त्रिया  (निदान एका तरी) अंधश्रद्धेपासून दूर राहिल्या आहेत हे खरे नाही का? त्यातून समानता आणायची तर स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही बंदी असावी असे आंदोलन करावे म्हणजे अंधश्रद्धानिर्मूलन आणि स्त्री- पुरुष समानता दोन्ही साधेल.
विनायक