त्यातून समानता आणायची तर स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही बंदी असावी असे आंदोलन करावे म्हणजे अंधश्रद्धानिर्मूलन आणि स्त्री- पुरुष समानता दोन्ही साधेल.

तत्त्वशः  मुद्दा ऐकायला चांगला वाटतो, पण काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत. 
१ - स्त्रिया व पुरुष दोघांनाही बंदी म्हणजे थोडक्यात शनीच्या पूजेस बंदी. असे करता येत नाही, कारण संविधाना प्रमाणे धर्म स्वातंत्र्य आहे व कोणाला शनी हा देव वाटत असेल तर त्याला किंवा तिला त्याच्या पूजेचे स्वातंत्र्य आहे. 
२- कशावरही बंदी घालण्या करता त्या वर बंदी घालण्याचे अधिकार सरकारला देणारा कायदा असावा लागतो. ज्याचा इतरांना काही त्रास होत नाही अश्या धर्म  कृत्या वर बंदी घालण्या करता कोणताही कायदा नाही.
३२- देव नसतोच, व शनी पुजा म्हणजे अंधश्रद्धा असे म्हणून जर शनी पूजेवर बंदी घालायची असेल तर फक्त शनी पूजे वरच का? कोणत्याही देवाच्या (यात सर्व धर्म आले) पूजे वर बंदी घालावी लागेल. कम्युनिस्टांनी तसे करून पाहिले पण त्यांना पण ते जमले नाही. अजून समाज तेवढा प्रगत झालेला नाही. केवळ भारतच नव्हे तर कोणताच नाही.  धर्म व अंधश्रद्धा यांच्यात फरक करणे जरूरी आहे. स्वतः नरेंद्र दाभोळकर यांनी पण थेट धर्म-पूजा अर्चा वगैरे वर बंदी घालण्यची भाषा केली नव्हती.