नास्तिक (विज्ञानवादी, अंधश्रद्धानिर्मूलनवादी वगैरे सर्वांना उद्देशून हा शब्द आहे) मनुष्याच्या दृष्टीने महत्त्व कशाला असावे? अंधश्रद्धानिर्मूलनाला की अंधश्रद्धा पाळण्यात स्त्री-
पुरुष समानता आणण्याला, हा मुद्दा आहे. अंधश्रद्धा पाळण्यात पुरुषाइतकीच संधी स्त्रीलाही मिळावी असे मत असणे नास्तिक माणसासाठी योग्य आहे का?
माझ्या मते नाही.  


इथे एकच उदाहरण देतो. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी सावरकर  (आणि बहुधा विनोबाही) टीकेचे धनी झाले होते, कारण ते "बेळगाव महाराष्ट्रात राहिले काय किंवा कर्नाटकात, जोपर्यंत ते भारतात आहे तोपर्यंत मला काहीच फरक पडत नाही" असे म्हणाले होते.  त्यांच्या मते हा मुद्दाच महत्त्वाचा नव्हता. त्याचप्रमाणे "स्त्रियांना प्रवेश दिला काय किंवा नाही दिला काय, मला काहीच फरक पडत नाही" असे नास्तिकाने म्हणण्यास काय हरकत आहे. उलट हिरीरीने "स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळायलाच हवा" असे म्हणण्यात काय अर्थ आहे? 

विनायक