समानतेचा मुद्दा काही लोकांच्या खरोखर लक्षात येत नाहीये, का ते तसे सोंग घेत आहेत, हे कळत नाही.
१- मी शुद्ध शाकाहारी आहे. अंड सुद्धा खात नाही, व इतर कोणीही खाउ नये अश्या मताचा आहे. समजा एक मांसाहारी हॉटेल आहे जिथे स्त्रियांना (किंवा कुठल्याही अमूक एक वर्गाला, उदाहरणार्थ पायजमा कुडता घातलेल्या लोकांना) प्रवेश बंदी आहे. मग मी असे म्हणावे का, कि मुळात जर मांसाहार (माझ्या मते) चुकिचा आहे तर तो करण्यात समानता आणण्यापेक्षा या बंदी मुळे किमान काही लोक तरी मांसाहार करण्या पासून वाचले हे चांगले झाले.
२- मला क्रिकेट अजिबात आवडत नाही. मी क्रिकेट पाहात नाही/ ऐकत नाही/ वाचत नाही/ चघळत नाही. माझ्या मते क्रिकेट हा वेळाचा अपव्यय आहे. त्यातून त्यात "फिक्सिंग" वगैरे गैर प्रव्रूत्ती आहेत. आयपीएल मध्ये तर क्रिकेट कमी व इतर नाटकेच जास्त आहेत. तर, उद्या जर मैदानात येऊन क्रिकेट सामने बघायला बीसीसीआय ने स्त्रियांना (किंवा कुठल्याही अमूक एक वर्गाला, उदाहरणार्थ टक्कल पडलेल्या लोकांना) बंदी घातली तर मी असे
म्हणावे का, कि मुळात जर (माझ्या मते) क्रिकेट वरच बंदी असायला हवी, तर आता ते पाहण्यात समानता आणण्यापेक्षा या बंदी मुळे किमान काही लोक तरी क्रिकेट बघण्या पासून वाचले हे चांगले झाले.
३- वरील परिच्छेदात "क्रिकेट" च्या जागी हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा, मराठी टीव्ही मालिका, पाश्चात्य संगीत, डान्स बार, इत्यादी सब्सटिट्यूट करून परत वाचावे.
चेतन पंडित