काही मुद्दे जे मागच्या प्रतिसादात राहूनच गेले
१- देव या संकल्पने वर विश्वास टेकनीकली जरी अंधश्रद्धा या प्रकारात येत असला तरी साधरणतः देव-धर्म यां वरील विश्वास याला अंधश्रद्धा म्हणत नाहीत. अंधश्रद्धा याचा अर्थ साधरणतः पिंपळावर कोंबडी कापल्याने आजार बरा होईल, वडाला प्रदक्षिणा घातल्याने मूल होईल, शेजार्याच्या घरात गुलाल माखलेले लिंबू टाकल्याने त्याचे वाटोळे होईल,  इत्यादी प्रकारचे विश्वास, असा असतो. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या परिभाषेत पण देवा वर विश्वास याचा समावेश नाही. 

२-अनेक कारणां करता समाजाला देव या संकल्पनेची गरज असते. प्रत्येक चुकीच्या वर्तनावर कायदा-पोलिस लक्ष ठेवू शकत नाही. "देव"  म्हणजे अंतराळात असलेला एक सीसीटीव्ही अशी कल्पना करा. पोलिस बघत नसले तरी हा सीसीटीव्ही सगळे बघत आहे, व त्याची नोंद ठेवत आहे. अंती कधीतरी त्याचा हिशेब द्यावाच लागेल. असा विश्वास समाजात असल्यास अनेक गैर वर्तनाला प्रतिबंध होऊ शकतो, जे पोलिसां कडून शक्य नसते.

३- "देवा वर माझा अजिबात विश्वास नाही, माझ्या मनगटा वर विश्वास आहे" हे वाक्य डायलॉग म्हणून फार छान आहे. पण असे म्हणतात कि विमान ३५,००० फूट उंचीवर उडत असताना वैमनिकाने घोषण केली "विमानात काही तरी मोठा बिघाड झालेला अहे व आता आपल्याला क्रॅश लँडिंग करावे लागणार आहे" किंवा डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सांगितले कि तुमच्या लाडक्या मुलाला कॅन्सर आहे, कि इतकी वर्षे स्वतःला नास्तिक म्हणून मिरवणारा पण एका क्षणात आस्तिक होतो व प्रार्थना करू लागतो. परिस्थिती मानवी उपायांच्या बाहेर गेली कि डिप्रेशन करता गोळ्या घेण्यापेक्षा प्रार्थना करणे केहांही चांगले.     

४- अंधश्रद्धा निर्मूलन करता ज्यांनी आपले सगळे आयुश्य वाहिले, त्या नरेंद्र दाभोळकर यांनी पण धर्म ऊखडून टाकण्याचा प्रयत्न केला 
नाही. त्यांचा देवावर विश्वास होता म्हणून नव्हे, तर तसे करणे व्यवहार्य नव्हते म्हणून.

५- तरी सुद्धा शनी पूजा ही अंद्धश्रद्धा आहे म्हणून त्याला विरोध करयच असल्यास, केवळ शनीच नव्हे तर इतर सर्व देवांना पण त्याच कारणा करता विरोध करावा लगेल. इथे जे लोक शनीपूजा म्हणजे अंधविश्वास अशी टिमकी वाजवीत आहेत, त्यांच्या पैकी किती लोकांची या करता तयारी आहे? 

चेतन पंडित