पण याच्या अंमलबजावणीत प्रत्येक प्रांताच्या अस्मिता आणि ईगो आड येणार. म्हणून तेव्हा सक्ती केली गेली नसावी. आज शिवजयंतीची तारीख प्रचंड कष्ट आणि संशोधनांती निश्चित केली गेली असली तरी ती मानण्यात राजकीय- सामाजिक अस्मिता, परंपरा आड येतात. या स्फोटबिंदूपाशी लोकभावना एकवटता येतात. मग अशा वेळी खरी व्यावहारिकता कोण पाहील? आणि वर्षारंभाचा दिवस म्हणजे तर धर्माशी निगडित असा सणाचा दिवस. सणाचा  दिवस.  धर्मात ढवळाढवळ कोण करील? आणि उत्तर भारतातल्या मोठ्या पट्ट्यात विक्रम संवत प्रचलित आहे. शालिवाहन शक नव्हे. म्हणजे त्यांचा नववर्षदिवस तर तब्बल साठ आठ महिन्यांनी बदलणार. इतक्या सगळ्या लोकांची मानसिकता बदलायची हे कठीण काम. मग नकोच ते.