उपहास आवडला आणि पटला.
ज्याला जो उपाय दिसतो/सुचतो त्याला तो करून बघावासा वाटतो. टू मेनी कुक्स. म्हणजे कुणाच्या तरी कोंबड्याने उजाडू दे एकदाचे. कोंबड्याच्या आरवण्यामुळे उजाडत नाही हे ठाऊक असले तरी घायकुतीला आल्यावर असे वेडेचार होतात.
बाय द वे, शेततळ्यांसाठी शेतांत मोठमोठे खड्डे करून ती सुपीक माती टाकतात कुठे?
आणि शेततळ्यांची योजना तर जुनीच आहे. मग या जल-शिवारांमध्ये वेगळे असे काय आहे? खरोखर उत्सुकता आहे जाणण्याची.
आता एक वेगळाच मुद्दा : पाणीसाठवणुकीला सर्वोच्च महत्त्व द्यायला पाहिजे हे मान्यच. पण आज जे नदीनाल्यांमध्ये खणून पात्राची खोली आणि रुंदी वाढवण्याचे काम जोरदारपणे चालले आहे ते शास्त्रसुद्ध रीतीने चालले आहे काय? एक तर लातूर,उस्मानाबाद, तेर हा सगळा टापू पुरातत्त्वदृष्ट्या अत्यंत समृद्ध प्रदेश आहे. पोकलेन मशीनचे उत्खनन खोलवर असते आणि मातीच्या ढिगाऱ्यात काही अवशेष असतील तर ते नाहीसे होतील. यावर पुरातत्त्वशास्त्रातल्या तज्ज्ञाची देखरेख असायला हवी असे वाटते.
पण खरोखर, असे दुष्काळ टाळण्यासाठी नक्की काय करायला हवे? की या परंपरेने कमी पावसाच्या भागात लोकसंख्या वाढल्यामुळे बीषण टंचाई जाणवते? की नद्यांच्या वरच्या भागात धरणे/बंधारे झाल्यामुळे खालच्या भागात नद्या कोरड्या पडल्या, आसपासच्या अमिनीला मिळणारा ओलावा थांबला, जमिनीत झिरपणारे पाणी आटले, विहिरी कोरड्या पडल्या, की पूर्वी इथे जेमतेम म्हणजे पोटापुरती शेती होत होती आणि अलीकडे ओलिताखाली शेतीचे प्रमाण वाढले? पाण्याचा वापर आणि उपसा वाढला?
गरीबी गेली आणि श्रीमंती आली का? की श्रीमंती वाढली आणि गरीबीही वाढली?