औरंगाबादच्या "राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचा"प्रमाणेच क्ल्याणचे हेमंत मोने भारतीय कॅलेंडरच्या प्रसाराचे काम अनेक वर्षे करीत आहेत. पण यात कोणालाही यश येण्याची शक्यता नाही, कारण, ग्रेगेरियन कॅलेंडर आपण समजतो तितके अशास्त्रीय नाही.
१. या कॅलेंडरप्रमाणे दिवस-रात्र विशिष्ट दिवशीच समसमान असतात.
२. वर्षातला सर्वात मोठा किंवा लहान दिवस ठरावीक दिवशी येतो.
३. कर्क संक्रांत किंवा मकर संक्रांत साधारणपणे निश्चित तारखांना येते.
४. भारतात येणारा पावसाळा जवळजवळ त्याच तारखेला येतो.
५. जगाच्या विविध भागांत येणारे ऋतू विशिष्ट तारखांना सुरू होतात.
६. वर्षातला सर्वात उष्ण किंवा थंड दिवस ठरावीक काळात येतो.
७. सूर्य ठरलेल्या तारखेला मृग (आणि इतर) नक्षत्रात येतो..
८. सूर्याची रास बदलण्याची तारीख आणि हिंदू पंचांगातला महिना बदलण्याची तारीख एकच असते. आणि,
९. जगातल्या प्रत्येक देशाने स्वीकारल्याखेरीज 'राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचलित होणे शक्य नाही.