चेतन पंडित यांच्या मताशी मी सहमत आहे. मला तर आश्चर्य वाटते कि खूप उत्साहाने घरातले लोक मराठी चित्रपट 
बघायला जातात (खरं तर ते कोणताही चित्रपट तितक्याच उस्ताहाने बघायला जातात, मग तो हिंदी का असेना) आणि जाताना मला देता येतील तेवढ्या शिव्या देतात. तुम्ही दुनियाके खिलाफ आहात, तुम्हाला कोणताच चित्रपट अथवा नाटक कसे आवडत नाही. पण माझ्या काही मौलिक शंकांचं ते निरसन करू शकत नाहीत. त्या म्हणजे , चित्रपटाला खिळवून ठेवणारी कथा असावी , हिंदी स्टाइल कॉमेडी तरी असावी किंवा तो भयपट तरी असावा, आणि तेच तेच विषय नसावेत वगैरे. पण ते जेव्हा बघून येतात , तेव्हा " पुन्हा म्हणून जाणार नाही पिक्चर बघायला, अगदी कोणी कितीही आग्रह केला तरी, मग त्यांच्यातच भांडणं होतात. आता ते माझ्याशी अजिवात बोलत नाहीत, कारण नेहमी प्रमाणे माझा विजय झालेला असतो आणि तो त्यांना आवडत नाही. आणि म्हणूनच मी सैराट पाहीन असं वाटत नाही. घरात मात्र सध्या सैराट ज्वर आहे. मी मात्र तटस्थ आहे. 
                                      पंडितांनी उल्लेखलेल्या समस्या ज्वलंत आहेत किंवा नाहीत हा वादाचा मुद्दा ठरू शकेल. पण त्यांची कारणं मात्र मला पटतात.