गंगाधरसुत,
खंरतर माझे "मत" तुमच्या लक्षात आलेच नाही. सैराट किंवा इतर कोणताही सिनेमा पाहावा कि न पाहावा या बाबत मी कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. आणि आपल्या ज्वलंत समस्या कोणत्या, हे तर अजिबात मांडले नव्हते. केदार पाटणकर यांनी मुद्दा मांडला होता कि ज्या वयात देशाच्या ज्वलंत समस्यांवर विचार करावयाच त्या वयात हे चित्रपट प्रेमगीते गायला शिकवीत आहेत.  कोणत्या ज्वलंत समस्या? तरुणांना रोजगाराच्या संधी, शेती क्षेत्राचे भवितव्य, पाणि, अन्न उत्पादन, पर्यावरण, सामाजीक असंतोष, असमानता, सुरक्षा, भ्रष्ताचार, . . . . वगैरे या आपल्या  ज्वलंत समस्या आहेत. पण वर्तमान पत्रात प्रामुख्याने चर्चा कशाची असते?  मराठी भाषेचे भवितव्य, साहित्य सम्मेलन,  नेमाडे / श्रीपाल सबनीस काय म्हणले इत्यादी. हे सर्व एक उपरोधिक (सरकास्टिक) भाष्य होते.

चेतन पंडित