नुकताच हा चित्रपट पाहण्याचा योग आला. चित्रपट चांगला वाटला.
कथानक सांगून त्याचा विचका करणे योग्य होणार नाही मात्र प्रसंग, पटकथा, चित्रीकरण, संवाद ... हे सर्व इतक्या ओघवतेपणे झाल्याचे इतर कोठल्या मराठी सिनेमात झाल्याचे आठवत नाही. कलाकारांची निवडही कथेशी, विषयाशी नेमकेपणाने जुळणारी आहे.